मनोरंजन सृष्टी दुःखात ! ‘या’ प्रसिद्ध गायिका चे झाले हृदविकाराच्या झटक्याने निधन

मनोरंजन सृष्टी दुःखात ! ‘या’ प्रसिद्ध गायिका चे झाले हृदविकाराच्या झटक्याने निधन

बॉलीवूडमधील आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ज्येष्ठ गायिकेचे नुकतेच निधन झाले आहे. नुकतेच अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने लखनऊ येथे निधन झाले होते. मिथिलेश यांनी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. मिथिलेश यांचा कोई मिल गया हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्याचबरोबर त्यांनी इतर चित्रपटातील ही आपल्या भूमिकातून सर्वांनाच न्याय दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गायक अभिनेते आणि कलाकार यांचे देखील निधन झाल्याच्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत. लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यासारखे कलाकार देखील आपल्याला सोडून गेले आहेत.

तर गेल्या वर्षीच्या सुमारास ऋषी कपूर, इरफान खान यांनी देखील हे जग सोडले. त्यानंतर अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आता देखील एका गायकीचे निधन झाले असून तिने अनेक चित्रपटात गाणी म्हटले आहेत. आपल्या अविट सुरांनी चहात्यांना दिव्य गाळ अनुभव देणाऱ्या जेष्ठ गायिका निर्मिला मिश्रा ( Nirmala Mishra ) यांचे नुकतेच निधन झाले आहे.

निर्मिला यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक गाणे म्हटले आहेत. तसेच बंगाली चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय हे 81 वर्षांचे होते. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत असताना अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वी निर्मिली यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांचा त्यातच मृत्यू झाला. रुग्णालयात त्यांना नेण्यात आली होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. बंगाली चित्रपट सृष्टीमध्ये निर्मिली यांचे खूप मोठे योगदान होते. निर्मला यांनी लहानपणापासूनच आपल्या संगीत शिक्षणाला सुरुवात केली होती.

निर्मिली यांनी हिंदी बंगाली आणि ओडिया या भाषेमध्ये गाणे म्हटले. त्यांचा या क्षेत्रातील प्रवास हा अतिशय खडतर होता. मात्र, असे असले तरी त्यांनी हार मानली नाही. गेल्या काही दिवसापासून त्या वेगवेगळ्या व्याधीने आजारी होत्या, असे असले तरी त्यांनी अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र, त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.

Team Hou De Viral