Bigg Boss फेम विकास पाटीलनं गावकडं बांधलं अलिशान घर, फोटो पाहून थक्क व्हाल!

Bigg Boss फेम विकास पाटीलनं गावकडं बांधलं अलिशान घर, फोटो पाहून थक्क व्हाल!

कलर्स मराठी वर नुकताच संपलेला मराठी बिग बॉस शो हा प्रचंड गाजला तो यात सहभागी झालेल्या कलाकारांमुळे. यात अनेक अभिनेता व अभिनेत्री सहभागी झाले होते. त्यांनी प्रचंड गदारोळ यामध्ये केला होता. या पर्वाचा विजेता विशाल निकम हा झाला.

असे असले तरी या शो मध्ये विकास पाटील हा देखील भाव खाऊन गेला होता. या शोमध्ये शेवटच्या फेरीमध्ये विकास पाटील, जय दुधाने, विशाल निकम गेले होते. त्यानंतर विकास पाटील हा या शोच्या बाहेर पडला. त्यानंतर जय दुधाने आणि विशाल निकम यांच्यामध्ये स्पर्धा लागली. त्यात विशाल निकम यांनी बाजी मारली.

या शोमध्ये सहभागी झालेला विकास पाटील याने नुकतीच एक गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिलेली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून ही गोष्ट शेअर केली आहे. बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी झालेली मीरा जगन्नाथ ही देखील प्रचंड चर्चेत आली होती. मीरा जगन्नाथ हीदेखील आता चर्चेत आली आहे.

कारण जय दुधाने याच्या सोबत चा तिचा एक व्हिडिओ अल्बम नुकताच प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओ अल्बम मध्ये दोघेही एका गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे या शोमध्ये भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई या सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

त्याचबरोबर कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील ही देखील या शोमध्ये सहभागी झाल्याने अनेक वाद निर्माण झाले होते. मात्र, कालांतराने तिने हा शो सोडला होता. विकास पाटील हा या शोमध्ये अत्यंत संयमीरित्या खेळला होता. त्याची चर्चादेखील प्रचंड झालेली होती‌. सोशल मीडियावर त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो गावाकडच्या घरी दिसत आहे.

अभिनेता विकास पाटील याने कोल्हापूर येथील गावी सुंदर घर बांधले आहे. विकासने बांधलेल्या नवीन घराची नुकतीच पूजा होती. याबाबतचे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत. फोटो शेअर करत विकास कॅप्शन मध्ये म्हणतोय की, कोणालाही आवडत नाही घर सोडून राहायला. जबाबदारी भाग पाडते गाव सोडायला.

परंतु गावाशी जोडलेली नाळ कायम टिकून राहण्यासाठी नवीन घर बांधले आणि त्याच वास्तुपूजन नमित्त माझं कोल्हापूर जिल्ह्यातील गलगले गावात येणे झाले. छान वेळ देता आला गाव आणि गावाकडील लोकांना. गावाकडच्या गोष्टींचे बातच निराळी सुंदर असे कॅप्शन देत विकासने घराचे आणि गावकऱ्यांबरोबरचे काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बिग बॉस सीजन 3 च्या घरात असताना विकासला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. त्यानंतर विकास महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचला. तर तुम्हाला विकासने कोल्हापूर येथे बांधलेले त्याचे नवीन घर आवडले का? अभिनेता विकास पाटील तुम्हाला आवडतो? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

Seema