संतापजनक ! विक्रम गोखले बद्दल ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे तीन दिवसापूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा देखील पसरली होती. त्यानंतर त्यांच्या मृत्यूलाही अनेकांनी आनंद लुटणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे अनेक जण संतापले होते.
शरद पोंक्षे यांनी देखील अनेकांना सुनावले होते. एखाद्या कलाकाराला अशा पद्धतीने ट्रोल करता का? असे म्हणून त्यांनी खडसावले देखील होते, तर विक्रम गोखले यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती किती, त्यांचे भाऊ कोण, शुभांगी गोखले यांचे नाते काय? मोहन गोखले कोण? अशा बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. यातूनच आता मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले हिला देखील अनेकांनी ट्रोल करून टाकले.
त्यावर सखी गोखले हिने आता सडेतोड उत्तर दिलेले आहे. विक्रम गोखले आणि मोहन गोखले हे दोघे भाऊ भाऊ आहेत. अशा बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. मोहन गोखले यांची कन्या म्हणजे सखी गोखले आहे. मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. या दोघांना सखी गोखले ही मुलगी आहे. मात्र, मोहन गोखले यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.
मोहन गोखले यांनी देखील अनेक चित्रपटात काम केले होते. एकूणच काय आता मोहन गोखले आणि विक्रम गोखले हे भाऊ असल्याचे सांगण्यात येत होते. यावर सखी गोखले हिने खुलासा करून सांगितले आहे की, विक्रम गोखले आणि माझे बाबांचे कुठलेही नाते नाही. आमचे केवळ कौटुंबिक संबंध आहेत आणि अनेकांनी मला मेसेज करून ट्रोल केले आहे की, मी विक्रम गोखले यांच्या निधनावर काहीच बोलले नाही.
सुरुवातीला मी सांगू इच्छिते की, एखादा व्यक्ती गेला असेल तर मी त्याच्यावर कमेंट करावी की नाही हा माझा पूर्णतः वैयक्तिक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विक्रम गोखले आणि आमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. आमचे एकमेकांचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत, असे तिने सांगितले आहे. विक्रम गोखले यांचा अभिनय पाहूनच मी मोठे झाले आहे. त्यांच्यासारखा नटसम्राट होणे शक्य नाही.
मात्र आता मला ट्रोल करणाऱ्यांना मी एक सांगू शकते की, तुम्ही माझ्यावर वेळ खर्च करण्यापेक्षा आपल्या ज्ञानात भर टाका. गुगलवर सगळीच मिळणारी माहिती ही खरी नसते आणि तुम्ही तुमची बुद्धी दुसरीकडे सत्कारणी लावा. जेणेकरून दुसऱ्याचा वेळ वाचेल आणि तुमचा देखील वेळ असेल. एखाद्या व्यक्तीला एखाद्याच्या मृत्यू विषयी बोलायचे नसेल तर तुम्ही त्याला सांगणारे कोण? असा प्रश्न देखील तिने विचारला आहे.
त्याचबरोबर आपली बुद्धी ही चांगल्या कामासाठी सत्कारणी लावा, असेही तिने सांगितले. हे सांगतानाच तिने विक्रम गोखले यांच्या विषयी माझ्या मनात नितांत आदर असल्याचे सांगितले आणि कुठल्याही गोष्टीवर मी पोस्ट करणे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असेही तिने म्हटले आहे तर सखी गोखले हिच्या या वक्तव्यावर आपले काय म्हणणे आहे? आम्हाला नक्की सांगा.