जाणून घ्या विक्रम गोखलेंच्या कुटुंबाबद्दल, 5 पिढ्या सिनेविश्वात सक्रिय

जाणून घ्या विक्रम गोखलेंच्या कुटुंबाबद्दल, 5 पिढ्या सिनेविश्वात सक्रिय

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी पुण्यातील वैकुंठ दाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रम गोखले हे गेल्यानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले. विक्रम गोखले यांच्या कुटुंबाविषयी अनेकांना माहिती नाही. विक्रम गोखले यांचे कुटुंब फार मोठे असून त्यांना घरातूनच कलेचा वारसा मिळाला आहे. पणजीपासूनच त्यांना कलेचा वारसा मिळाला आहे, तर या लेखांमध्ये आपण याबद्दलच माहिती जाणून घेऊया..

दुर्गाबाई कामत – दुर्गाबाई कामत या विक्रम गोखले यांच्या पणजी होत्या. दुर्गाबाई कामत यांनी मोहिनी भस्मासुर या चित्रपटात काम केले होते. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी या चित्रपटाचे निर्मिती, दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्या पहिल्या महिला कलाकार होत्या.

कमलाबाई गोखले – कमलाबाई गोखले या विक्रम गोखले यांच्या आजी होत्या. त्यांनी देखील बालकलाकार म्हणून सगळ्यात आधी भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये काम केले. मोहिनी भस्मासुर या चित्रपटात त्यांनी मोहिनी या बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका ही खूपच गाजली होती.

चंद्रकांत गोखले – चंद्रकांत गोखले हे विक्रम गोखले यांचे वडील होते. चंद्रकांत गोखले यांनी देखील मराठी चित्रपट सृष्टीची खूप दिवस सेवा केली. हिंदी चित्रपट सुट्टी मध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. लोफर या चित्रपटात देखील त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती.

हेमावती – विक्रम गोखले यांच्या आईचे नाव हेमावती असे होते. हेमावती यांनी देखील काही चित्रपटात काम केल्याची माहिती आहे. त्यांनी देखील उत्कृष्ट असा अभिनय केला होता.

विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव वृषाली असे आहे. त्याचबरोबर विक्रम गोखले यांना दोन मुली असून दोन्ही मुलींची नावे नेहा आणि निशा असे आहे, तर विक्रम गोखले यांच्या बद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral