‘तुझेच गीत मी गात आहे’ ह्या मालिकेत होणार ‘ह्या’ प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्याची एन्ट्री

‘तुझेच गीत मी गात आहे’ ह्या मालिकेत होणार ‘ह्या’ प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्याची एन्ट्री

छोट्या पडद्यावर सध्या तुझेच मी गीत गात आहे, ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये स्वरा आणि मल्हार यांची कहाणी आता पुढे सरकताना दिसत आहे.

अनेक वर्षानंतर या मालिकेमध्ये आपल्याला उर्मिला कोठारे कानिटकर ही दिसली आहे. तर या मालिकेमध्ये अभिजीत खांडेकर याने मल्हार ही भूमिका साकारली आहे. अभिजीत खांडकेकर या आधी आपल्याला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये गुरुनाथ सुभेदार या भूमिकेमध्ये दिसला होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

त्यानंतर आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये स्वराची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडते, तर या मालिकेमध्ये आपल्याला प्रिया मराठे ही देखील दिसत आहे. प्रिया मराठे हिने देखील या मालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. तिची या मालिकेत नकारात्मक भूमिका आहे.

प्रिया मराठे ही नकारात्मक भूमिकांसाठी खूप ओळखली जाते. याआधी देखील तिने या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. अनेकदा मालिकेमध्ये वेगळा ट्विस्ट आणण्यासाठी कलाकाराची आदली बदली किंवा एखादा नवीन कलाकार मालिकेत घेण्यात येतो.

त्याप्रमाणे आता मालिकेमध्ये आता लवकरच एका नवीन कलाकाराची एन्ट्री होणार असल्याचे संकेत मिळत आहे. कारण की याबाबतचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल आहे. याप्रमाणे हा कलाकार देखील दिसत आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की, हा कलाकार म्हणजे नेमकं कोण आहे, तर आम्ही आपल्याला याबद्दल सांगू.

हम दिल दे चुके सनम या या चित्रपटामध्ये नंदिनीच्या वडीलाची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आता तुझेच गीत मी गात आहे या मालिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेमध्ये ते हम दिल दे चुके सनम या चित्रपटाप्रमाणेच संगीत शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम गोखले हे अतिशय ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते आहेत.

त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. याआधी अग्निहोत्र या मालिकेतील त्यांची भूमिका खूप गाजली होती. आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये विक्रम गोखले आपल्याला मल्हार याच्या गुरुजींच्या भूमिकेत दिसणार आहे. ते या मालिकेमध्ये मुकुल नारायण या संगीत शिक्षकाची भूमिका साकारणार आहेत.

तर आपले याबद्दल काय मत आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral