सोशल मीडिया स्टार विनायक माळी ला लागली लॉटरी, लवकरच दिसणार चित्रपटात दिसणार, ही अभिनेत्री करणार त्याच्यासोबत रोमान्स

सोशल मीडिया स्टार विनायक माळी ला लागली लॉटरी, लवकरच दिसणार चित्रपटात दिसणार, ही अभिनेत्री करणार त्याच्यासोबत रोमान्स

गेल्या काही वर्षापासून मोबाईलने प्रचंड क्रांती केली आहे. मोबाईलने क्रांती केल्यानंतर भारतामध्ये इंटरनेट देखील आता मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. फोरजी नंतर आता फाईव्ह जी देखील उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप देखील वापरता येतात. त्याचप्रमाणे आता मोबाईलमध्ये सोशल मीडियाचा वापर देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सुरू झालेले इंटरनेट कॅफे हे आता ओस पडू लागली आहेत. याचे कारण म्हणजे मोबाईलच आहेत. मोबाईलवरून आता सगळं काही करता येते. ऑनलाइन सर्वकाही असल्यामुळे आता दुकानावर अवलंबून कोणालाही राहाव लागत नाही. सोशल मीडिया आता खूप मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे. या माध्यमातून अनेक जण आपल्या वस्तू, आपला व्यवसाय, आपले कलागुण देखील दाखवत असतात.

सोशल मीडिया तसेच टिक टॉक वर अनेक जण स्टार झालेले आहेत. ते या माध्यमातून अभिनेता व अभिनेत्री झालेली आहेत. माधुरी पवार हे त्यातीलच एक नाव म्हणावे लागेल. माधुरी पवार ही टिक टॉक स्टार होती. त्यानंतर तिला “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका मिळाली होती. नंतर ती देव माणूस या मालिकेत दिसली होती. आता ती चांगली अभिनेत्री झालेली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून वर ती आलेली आहे.

असाच एक तरूण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटात येण्यास सज्ज झाला. या अभिनेत्याचे नाव विनायक माळी असे आहे. विनायक माळी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना माहीतच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याचे लाखो फॉलॉवर सोशल मीडिया वर आहेत. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद देखील मोठ्या प्रमाणात साधत असतो.

त्याचे चाहते देखील त्याला खूप प्रोत्साहन देत असतात आणि तो चाहत्यांनाही कधी नाराज करत नाही. विनायक आता एका चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव “मॅड” असे असणार आहे. आणि हा चित्रपट 2022 मध्ये येणार असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये त्याच्यासोबत टकाटक अभिनेत्री रितिका श्रोत्री ही दिसणार आहे. त्यामुळे आता या दोघांची जोडी या चित्रपटामध्ये रोमान्स करताना दिसणार आहे.

हा एक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विनायक माळी आणि रितिका तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे.

Team Hou De Viral