विराजस आणि शिवानीने चाहत्यांना दिली ‘गुडन्यूज’, लवकर…

विराजस आणि शिवानीने चाहत्यांना दिली ‘गुडन्यूज’, लवकर…

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी नुकतेच लग्न केले आहे. या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टी तसेच बॉलीवूड मधील देखील अनेक कलाकार उपस्थित होते. विशेष म्हणजे या लग्नासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची देखील आवर्जून उपस्थिती पाहायला मिळाली.

राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. आता या दोघांचे लग्न होऊन देखील या लग्नाची चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. अधून मधून सोशल मीडियावरून या दोघांच्या लग्नाच्या बातम्या येतच असतात. शिवानी रंगोळे हीदेखील अभिनेत्री आहे. त्याचप्रमाणे विराजस कुलकर्णी हा देखील अभिनेता आहे. विराजस कुलकर्णी आपल्याला माझा होशील ना या मालिकेत दिसला आहे.

या मालिकेमध्ये त्याने अप्रतिम असे काम केले आहे. या आधी देखील त्याने छोट्या जाहिराती आणि मालिकांमधून काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विराजस कुलकर्णी याची आई म्हणजे मृणाल कुलकर्णी यादेखील अभिनेत्री आहेत.

त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. शेर शिवराज या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. तसेच मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेली आई जिजाऊंची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. शिवानी रांगोळे देखील अभिनेत्री आहे. ती देखील सोशल मीडिया खूप सक्रिय असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्याना वेगवेगळी माहिती देत असते. विराजस आणि शिवानी यांचे बाऊडींग खूप चांगल्या प्रकारचे असल्याचे देखील सांगण्यात येते. हे दोघेही एकमेकांना पूरक असल्याचे देखील बोलले जाते. आता या दोघांनी एक गुड न्यूज दिल्याची बातमी समोर आली आहे. आपल्याला वाटले असेल की हे दोघं आई बाबा होणार आहेत की काय? मात्र असे काही नसून या दोघांनी एक नवीन कंपनी सुरू केली आहे.

या दोघांनी वीरांनी या नावाने एक ब्रँड सुरू केला आहे. रफूचक्कर नावाचा एक मोठा ब्रँड आहे. या ब्रँडची त्यांनी कंपनी विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे आणि ते आता कपडे खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील करणार आहेत. एका नाट्यसंस्थेला त्यांनी काही कपडे विकले असल्याची माहिती समोर आली आहे, तर शिवानी आणि विराजस कुलकर्णी यांची जोडी आपल्याला आवडते का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral