पुण्यातील सलोनी सातपुतेच्या ‘त्या’ VIRAL VIDEO मागील REAL कहाणी आली समोर

पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली असताना पुण्यातील एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
पुण्यातील आंबेगाव पठार येथील मोहननगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपुते हिचा कोरोनाबाधित बहिणीची घरवापसी झाल्यानंतर रस्त्यावर उतरवून डिजे लावून केलेला भन्नाट डान्स हा सोशल मीडियावरचा चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये सलोनी ही ‘टाय टाय फिश…’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
मात्र, सलोली इतका भन्नाट डान्स नेमकं कोणासाठी करतेय, याचं कोड अनेकांना पडलं असेलच. तिच्या या व्हायरल व्हिडिओमागील रिअल कहाणी आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहे.पुण्याच्या स्वामी समर्थ भागात राहणाऱ्या सलोनीचे आई-वडील, आजी-आजोबा आणि बहीण अर्थात घरातील सगळेच कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र, एकटी सलोनी कोरोना निगेटिव्ह आहे. त्यामुळे ती घरी आहे. सलोनीची बहीण कोरोनावर मात करून घरी आली तेव्हा तिनं आपल्या बहिणीचं दणक्यात स्वागत केलं. ‘टाय टाय फिश…’ या गाण्यावर डान्स करतच तिनं आपल्या बहिणीला कॉलनीच्या गेटपासून घरापर्यंत आणलं. सलोनीचं हे स्पिरिट पाहून बहीणही नाचात सहभागी झाली आणि मास्क घालूनच ती पण थिरकली आणि हाच डान्स व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घरातील सगळेच कोरोनाबाधित झाल्याने परिसरातील लोकांच्या आमच्याकडे पाहाण्याच्या नजरा बदललेल्या. मात्र काही मित्र-मैत्रिणी आणि मुख्यतः डॉक्टर्स यांनी दिलेली साथ मोलाची ठरली. एकेक करत सगळे कोरोनातून बरे झाले. सर्वात शेवटी बहीण रुग्णालयातून घरी आली तेव्हा तर डिजे लावून ‘डंके की चोट पर बेभान नाच करत आपल्या भावनांना मुक्त वाट करून दिल्याचं सलोनी सातपुते हिनं सांगितलं.
घरातील सर्वच सदस्यांना कोरोना झाला तरी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकणारी प्रोफेशनल डान्सर असणारी सलोनी ही खचली नाही. आई-वडील, वडिलांचे वडील आणि आईची आई आणि बहीण असे एकेक करत सगळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
सलोनी देखील होक क्वारंटाइन होती. मात्र, तिन हिंमत सोडली नाही. परिसरातील काही लोकांच्या वागण्यामुळे तिच्यात अपराध गंड निर्माण झाला होतो, मात्रही तात्पुरता होता, असं सलोनीनं सांगितले.काही जवळचे मित्र-मैत्रिणी आणि मुख्यतः उपचार करणारे डॉक्टर्स यांच्यामुळे सलोनी आणि तिच्या कुटुंबीयांनी या संकटाचा नेटाने मुकाबला केला.
Viral Video : करोनावर मात करुन आलेल्या बहिणीचं दणक्यात स्वागत पुण्याची सलोनी सातपुते सोशल मीडियावर व्हायरल
Posted by नवा महाराष्ट्र on Saturday, July 18, 2020
काय म्हणाली सलोनीची बहीण स्नेहल? –
आयुष्य हे एक महोत्सव आहे आणि ते साजरे केले पाहिजे. कोरोनासारखा रोग ज्यावर अजून लस सापडली नाही आहे. म्हणून घाबरून जाणारे गलितगात्र होणारे अनेक जण आहेत. या सर्वांनाच सलोनीने दाखवून दिलं आहे. कितीही संकटे आली तरी खचू नका give up करू नका we will win…असं स्नेहल सातपुते हिनं सांगितलं आहे.
बातमी – News18 Lokmat