Video : पहिल्यांदाच विराटच्या लेकीचा चेहरा आला सर्वांसमोर, पहा वामिकाची पहिली झलक..

Video : पहिल्यांदाच विराटच्या लेकीचा चेहरा आला सर्वांसमोर, पहा वामिकाची पहिली झलक..

भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहली देखील या संघात सहभागी आहे. विराट कोहली सध्या अतिशय बहारदार खेळी करताना दिसत आहे.

विराट कोहलीची मुलगी वामिका हिचा चेहरा पाहण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अनेक जण धडपडत होते. मात्र, तिचा चेहरा कोणालाही पाहता येत नव्हता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काही वर्षापूर्वी धुमधडाक्यात लग्न केले. त्यानंतर ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी कायम संपर्क असते.

तसेच या दोघांनी मिळून अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलेले आहे. मात्र, मुलीचा चेहरा काही या दोघांनी आतापर्यंत दिसू दिला नव्हता. अनुष्का शर्मा हिने ‘तुझमें रब दिखता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2008 हा चित्रपट आला होता. या चित्रपटांमध्ये तिने जबरदस्त असे काम केले आणि पहिल्या चित्रपटात तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर आलेल्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातही तिने धमाकेदार असे काम केले. या चित्रपटात रणवीर सिंह यांची भूमिका होती. हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. या दोघांची जोडी देखील खूपच चर्चेत आली होती. त्यानंतर त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चाही सुरू झाली होती.

हे दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील त्या वेळेस आल्या होत्या. मात्र, कालांतराने रणवीर याच्या आयुष्यामध्ये दीपिका पदुकोण हिची एन्ट्री झाली आणि या दोघांनी नंतर लग्न केले. अनुष्का शर्माचे नाव अनेक जण सोबत जोडले गेले असले तरी गेल्या काही वर्षांपासून ती विराट कोहली याला डेट करत होती.

त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी अतिशय धूम धडाक्यात लग्न देखील केले. या दोघांना वर्षभराच्या कालावधीनंतर मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले. मात्र, विराट कोहली याने जाणून बुजून त्याच्या मुलीला आजवर सोशल मीडियापासून दूर ठेवले होते. तिचा चेहरा पाहण्यासाठी अनेक जण धडपडत होते.

मात्र, तिचा चेहरा काही कोणाला दिसत नव्हता. आता भारतीय संघ हा दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. या वेळी विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली. त्याला चिअरअप करण्यासाठी अनुष्का शर्मा ही पहिल्यांदा स्टॅन्ड मध्ये आली. यावेळेस तिच्या कडेवर छोटी वामिका होती. वामिका हिला पाहिल्यानंतर सगळ्या कॅमेराच्या नजरा तिच्याकडे गेल्या.

त्यानंतर अनेकांनी तिचे फोटो टिपले आणि क्षणार्धात हे फोटो जगभरामध्ये व्हायरल झाले. त्यामुळे आता वामिकाचा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे, तर आपल्याला वामिका बद्दल काय वाटतं आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral