भारताच्या ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला अटक करण्याची मागणी, जाणून घ्या

भारताच्या ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला अटक करण्याची मागणी, जाणून घ्या

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्नाः भाटिया यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कोहली-तमन्ना यांच्यावर ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चेन्नई येथील वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने मद्रास हायकोर्टाला सांगितले आहे की, ऑनलाइन सट्टेबाजीवर बंदी घालण्याच्या सूचना जारी कराव्यात कारण त्यांचे मानने आहे को तरुणपिढीला याचे व्यसन लागत आहे.

ऑनलाईन सट्टा खेळणारी कंपनी विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांसारख्या कलाकारांचा वापर करुन तरुण पिढीला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी या दोघांना अटक झाली पाहिजे. वकिलाने ही याचिका या आधारावर दाखल केली आहे की नुकत्याच एका तरुणाने ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये हरलेली रक्कम परत करता आली नाही म्हणून आ-त्म-ह-त्या केली होती.

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया मोबाईल प्रिमियर लीगची जाहिरात करतात. हे दोघंही गेमिंग प्लॅटफॉर्मचे ब्रँड अम्बासिडर आहेत. एमपीएलचे सध्या ३ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त यूजर्स आहेत.

या प्लॅटफॉर्मवर ४० पेक्षा जास्त गेम्स आहेत. आयपीएलच्या आधी एमपीएलजवळ सहा क्रिकेट गेम्स आहेत ज्यामुळे यूजर्सना जास्त पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Team Hou De Viral