डोक्यात घाम येणे आणि ही 6 लक्षणें म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन ‘डी’ गरज आहे, जाणून घ्या त्याबद्दल

डोक्यात घाम येणे आणि ही 6 लक्षणें म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन ‘डी’ गरज आहे, जाणून घ्या त्याबद्दल

आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी’ची कमतरता असेल तर आपल्याला विविध आजार जडू शकतात. विटामिन डीमुळे आपल्या शरीराचे कामकाज हे अतिशय सुरळीतपणे चालू शकते. विटामिन डीचा सर्वात मुख्य स्त्रोत हा सूर्यप्रकाश असतो. जर आपण सूर्यप्रकाशात अधिक वेळ खेळत असाल तर आपल्याला विटामिन डी कधीही कमी पडणार नाही.

मात्र, आपण कायम किंवा घरात बंदिस्त असाल तर आपल्याला डी व्हिटॅमिन ची फार मोठी कमी पडू शकते. त्यामुळे उन्हामध्ये किमान अर्धा तास तरी थांबले पाहिजे. यामुळे आपल्याला डी व्हिटॅमिन मिळू शकते. डी विटामिन कमी असण्याचे काही लक्षणे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

1) डोक्यात घाम येणे : वाढत्या वयानुसार अनेक लोकांना डोक्यात घाम येण्याची समस्या असते. मात्र, जर आपल्याला विनाकारण डोक्यात घाम येत असेल तर आपल्या शरीरातील विटामिन डी कमी झाले असे आपण समजावे. त्यानुसार आपण काही वेळ उन्हात थांबावे. यामुळे आपल्याला विटामिन डी ची कमी भरून घेण्यात मदत मिळेल. तसेच योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा.

2) हाडे दुखतात : विटामिन डी ची कमी आहे अशा लोकांचे हाडे हे कायम दुखत असतात. त्यांना हाडांचा कायम त्रास असतो. त्यामुळे व्हिटॅमिन डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये रोज बसावे. यामुळे आपल्या शरीरातील विटामिन डी वाढीस लागते आणि आपली हात दुखणे समस्या कमी होऊ शकते. तसेच आपण यावर डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकतो.

3) मास पेशी दुखतात : जर आपल्या शरीरामध्ये विटामिन डी कमी असेल तर आपल्या मासपेशी दुखायला लागतात. त्यामुळे आपण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. तसेच विटामिन डी वाढवण्यासाठी आपण कोवळ्या उन्हात देखील बसता येईल. विटामिन डी साठी इत र स्त्रोत देखील आहेत. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण यावर उपाय करू शकता.त्यानंतरही आपल्या व्हिटॅमिन डी’ची कमतरता भरून देऊ शकते.

4) रोग प्रतिकारक्षमता : आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास आपल्या शरीरावर याचा फार मोठा परिणाम होतो. तसेच आपली रोगप्रतिकार क्षमता देखील कमी होण्यास हे कारणीभूत ठरते. त्यामुळे विटामिन डी हे कधीही कमी पडू देऊ नये. यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतात. कोवळ्या उन्हात रोजच्या रोज बसावे. यामुळे प्रतिकार क्षमता देखील आपली वाढून हाडे देखील मजबूत होतात.

5) थकवा : जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास आपल्याला हाडे दुखणे सोबतच आपल्या इतर आजार देखील जोडू शकतात. म्हणजेच आपल्याला थकवा आणि कायम सुस्ती आल्यासारखे वाटते. आपण कायम उत्साही न राहता या आजाराचा शिकार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची कधीही कमी पडू देऊ नये. विटामिन डी वाढण्यास आपल्याला थकवाही जाणवणार नाही आणि आपल्याला सुस्ती देखील येणार नाही.

6) केस गळती : आपल्या शरीरातील विटामिन कमी झाले असल्यास अनेक लोकांकडून आपल्याला देखील केस गळतीची समस्या होऊ शकते. त्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी हे आपण कायम स्थिर ठेवले पाहिजे. यासाठी आपण उन्हाचा स्त्रोत चांगल्याप्रकारे वापर करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral