हिट मालिका देऊन आजकाल ‘ह्या’प्रसिद्ध अभिनेत्री कुठे गायब झाल्यात

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहे की ज्यांनी सुरुवातीला अनेक मालिका या हिट दिल्या. पहिल्या मालिकात त्यांना यश देखील मिळाले. मात्र कालांतराने नंतर त्यांना या मालिकातून यश मिळणे बंद झाले, तर काही अभिनेत्रींचे लग्न झाले. त्यामुळे या अभिनेत्रींनी मालिका विश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता या अभिनेत्री नेमक्या कुठे आहेत काय करत आहेत ते जाणून घेऊया.
नेहा गद्रे – नेहा हिने 2019 मध्ये ईशान बापट याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर ती मराठी चित्रपट सृष्टी मधून गायब झाली, असे म्हणावे लागेल. नेहा हिने स्टार प्रवाह वरील मन उधान वाऱ्याचे या मालिकेमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. यासोबतच नेहाने मोकळा श्वास या चित्रपटातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. त्यानंतर तिने फोटोकॉपी या चित्रपटाची निर्मिती देखील केली. सध्या तरी नेहा हिने मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहण्यास पसंत केले आहे.
तितिक्षा तावडे – अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे. सरस्वती या मराठी मालिकेतून तितिक्षा ही आपल्याला दिसली होती. यासोबतच तू अशी जवळी रहा या मालिकेतूनही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. गेल्या काही वर्षात नेहा ही आपल्याला नवीन कुठल्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही.
कादंबरी कदम – कादंबरी कदम ही देखील अनेक चित्रपटात मालिकात आपल्याला दिसलेली आहे. मकरंद अनासपुरे सोबत तिने एका चित्रपटात तुफान काम केले होते. कादंबरी कदम हिने 2016 मध्ये अविनाश अरुण याच्यासोबत लग्न केले असून या दोघांना एक मुलगा देखील आहे. अवघाची संसार, ही पोरगी कोणाची, यासारख्या मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. तुला शिकवीन चांगला धडा यासारख्या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून ती म्हणून m क्षेत्रापासून दूर आहे.
सुरुची आडारकर – सुरुची हीने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. कारे दुरावा यासारख्या मालिकात तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. एक घर मंतरलेलं, अंजली यासारख्या मालिकातून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. सध्या तरी आपल्याला सुरुची ही मनोरंजन विश्वापासून दूर असल्याचे दिसते.
खुशबू तावडे – मराठी मालिका विश्वातील खुशबू तावडे ही देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2016 मध्ये खुशबू तावडे हिने मराठमोळा अभिनेता संग्राम साळवे यांच्यासोबत लग्न केले आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. एक मोहर अबोल, तारक मेहता का उल्टा चश्मा अशा सुप्रसिद्ध मालिका तिने काम केले आहे.
मृणाल दुसानिस – मृणाल हिने देखील अनेक मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. तू तिथे मी यासारख्या मालिकेतून तिने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मृणालने नीरज मोरे याच्यासोबत लग्न केले असून या दोघांना एक मुलगी देखील आहे.
जुई गडकरी – जुई गडकरी हिने स्टार प्रवाह वरील पुढचं पाऊल या मालिकेतून आपले अभिनेते छाप सोडली होती. त्याचप्रमाणे वर्तुळ या मालिकेतील तिने काम केले होते. बिग बॉस या शोमध्ये देखील तिने काम केले होते. मात्र, ती आता गेल्या काही वर्षापासून म्हणून विश्वापासून दूरच आहे. ती मध्यंतरी आजारी होती. त्यामुळे तिने मालिकेपासून दूर राहणे पसंत केल्याचे सांगण्यात येते.
शिवानी सुर्वे – शिवानी सुर्वे हिने देवयानी या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली होती. शिवानी लवकरच अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्न करणार आहे. मराठी बिग बॉस दुसऱ्या भागात या चित्रपटात शिवानी आपल्याला दिसली होती.