कोण होते गायक मास्टर मदन, ज्यांच्यापासून प्रेरित होऊन ‘Qala’ हा सिनेमा आलाय

नुकताच ‘कला’ (Qala) नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला आहे. अन्विता दत्त (Anvita Dutt) दिग्दर्शित या चित्रपटात तृप्ती डिमरी (Trpti Dimri), स्वस्तिका मुखर्जी (Swastika Mukherjee) आणि बाबिल खान ( Babil Khan) या कलाकारांनी काम केले आहे. बाबिल हा इरफान खान ( Irfan Khan ) यांचा मुलगा आहे. ‘कला’ (Qala) हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांने जगन नावाच्या उदयोन्मुख गायकाची भूमिका साकारली होती. ज्याला लहान वयात खूप प्रसिद्धी मिळते. ते पाहून त्याचे सहकारी गायक त्याचा तिरस्कार करू लागतात. दरम्यान, जगनचा आवाज खराब होऊ लागतो. कारण त्याला पारा (Mercury) दिला जातो. आणि पुढच्या काही दिवसांतच त्याचा मृत्यू होतो.
बाबिलने साकारलेली जगनची ही व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यातून प्रेरित आहे. मास्टर मदन (Master Madan) यांच्या कथेतून. मास्टर मदन यांची अत्यंत कमी वयातच त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध गायकांमध्ये गणना केली जात होती. वयाच्या साडेतीन व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात अत्यंत उत्तम अशी कामगिरी केली होती. 10-12 वर्षांच्या संगीत कारकिर्दीत त्यांनी एकूण 8 गाणी गायली. त्यापैकी दोनचे रेकॉर्डिंग सहज उपलब्ध आहे. असे म्हणतात की, मास्टर मदन 15 वर्षांचे असताना दुधात पारा मिसळून कोणीतरी त्यांचा जीव घेतला.
जालंधरच्या खानखाना गावात अमर सिंह आपली पत्नी पूरण देवी आणि मुलांसोबत राहत होते. अमर सिंह इंग्रजांसाठी काम करायचे. त्यांना संगीतात प्रचंड रस होता. घरात अनेक वाद्ये ठेवलीले होती. जे अमर सिंह आणि त्यांची मुले वाजवत असत. विशेषतः त्यांची मोठी मुलगी शांती. जेव्हा उन्हाळा येत तेव्हा इंग्रज सरकार आपल्या बेडबस्तारा घेऊन शिमल्याला शिफ्ट व्हायचे. तेव्हा अमर सिंह यांचे कुटुंब शिमल्याच्या लोअर बाजारातील बुटेल इमारतीत राहायचे.
28 डिसेंबर 1927 रोजी अमर सिंह यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. नाव त्याचे मदन ठेवण्यात आले. मदन दीड महिन्याचा होता, तेव्हा त्यांच्या घरात एक माकड शिरले. घरातील सदस्यांसमोर माकडाने मदनला उचलून टेरेसवर नेले. घरातील सदस्य माकडा पासून मदन ला वाचवण्या प्रयत्न करत होते. पण त्याचा काहीच फरक पडत नव्हता. माकड मुलाला खाली फेकून देईल अशी भीती सर्वांना वाटत होती. तेवढ्यात शांतीला आठवलं की घरात एक संत्री पडलेली आहे. तिने धावत जाऊन ती संत्री आणली आणि माकडाच्या समोर फेकली. त्यानंतर माकडाने मदनला सुरक्षितपणे जमिनीवर ठेवले आणि संत्री घेऊन पळून गेले.

मदन जसा मोठा होत होता त्याला समजले होते की घरातील वातावरण अतिशय संगीतमय आहे. असे म्हटले जाते की वयाच्या दोन-अडीच वर्षापासून त्यांनी त्यांची बहीण शांती यांच्याकडून संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. जून 1930 मध्ये मदन साडेतीन वर्षांचा असताना सोलन च्या धरमपूर येथे एक कार्यक्रम होता. तिथे मदनने ‘वंदन है शारदा नमन करू’ हे भजन गायले. त्याच्या कारकिर्दीतील ही पहिली सार्वजनिक कामगिरी होती. ज्याने त्याला तिथे गाताना ऐकले/पाहिले, त्या प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते. कारण तीन वर्षांच्या मुलाच्या वयाच्या मनाने ते भजन खूप परिपक्व गायन होते.
त्या काळात के एल सैगल K.L Saigal शिमल्यात रेमिंगट न नावाच्या टाइपरायटर कंपनीत काम करायचे. मास्टर मदन नावाच्या गायकाची बातमी त्यांच्यापर्यंत तोंडी पोहोचली. ते अमर सिंह यांच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मदन यांची भेट घेतली. त्यांना रियाज करताना ऐकले. ते देखील मदन पासून प्रभावित झाल्याशिवाय राहू शकले नाही. यानंतर मदन कडे त्यांचे येणे जाणे चालू राहिले जोपर्यंत मदन न्यू थिएटरमध्ये सामील होण्यासाठी कलकत्त्याला गेले नाही.

हे तेच कुंदन लाल सहगल होते, जे नंतर देशातील दिग्गज गायक आणि अभिनेते बनले. त्यांना भारताचे पहिले सुपरस्टार देखील मानले जाते. त्यांनी एकूण 36 चित्रपटांमध्ये काम केले, असून त्यापैकी 28 हिंदी चित्रपट होते आणि बाकीचे बंगाली होते. त्यांनी ‘सुबह का सितारा’, ‘तानसेन’, ‘देवदास’, ‘शाहजहाँ’, ‘परवाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ‘जब दिल ही टूट गया’, ‘जीने का ढंग सिखा जा’ आणि ‘ए दिल-ए-बेकरार झूम’ सारखी गाणी गायली.
मास्टर मदन यांचे शालेय शिक्षण शिमला येथील सनातन धर्म विद्यालयातून झाले. दिल्लीच्या रामजस स्कूलमधून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. यादरम्यान ते देशाच्या विविध भागात स्टेज परफॉर्मन्स देत राहिले. याशिवाय 1931 ते 1942 पर्यंत ते आकाशवाणी Air (All India Radio) मध्ये काम करत राहिले. बडे गुलाम अली खान, दिलीप चंदरवेदी, दिना कव्वाल, मुबारक अली फतेह अली यांसारख्या दिग्गजांसह ऑल इंडिया रेडिओच्या या लाइनअपमध्ये मास्टर मदन देखील उपस्थित होते. जे त्यांच्या वयाच्या मनाने खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या लोकप्रियतेमुळे देशातील सर्व नव्या गायकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, असे म्हणतात. मास्टर मदनमुळे आपल्याला चांगल्या संधी मिळत नसल्याचं त्यांना वाटत होतं.
1942 मध्ये मास्टर मदन यांनी कलकत्ता येथे स्टेज परफॉर्मन्स दिला होता. येथे त्यांनी ‘विनती सुनो मोरी अवधपूर के बसैया’ हे गायले होते. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन जनतेने त्यांना भरपूर बक्षीस दिले. पैसेच काय तर त्यांना सोने देखील बक्षीस स्वरूपात मिळाले. त्यानंतर ते पुन्हा दिल्लीला आले आणि आकाशवाणीसाठी गायन सुरूच ठेवले. मात्र त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांना ताप आला होता, जो काय जात नव्हता. असे म्हणतात की मास्टर मदन यांना कोणीतरी पारा मिसळलेले दूध पाजले होते. यामुळे ते आजारीच राहिले आणि काही दिवसांनंतर म्हणजे जून 1942 मध्ये त्यांचे निधन झाले. तेव्हा ते फक्त 15 वर्षांचे होते. कॉन्सपिरेसी थ्योरीज़ नुसार त्यांच्या एका सहकारी गायकानेच हे कृत्य केले होते. कारण त्यांना असे वाटत होते की जर मास्टर मदन राहिले तर त्यांना कोणीच मागे टाकून पुढे जाऊ शकणार नाही.
मास्टर मदन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी, गझल आणि ठुमरिया गायल्या. परंतु त्यापैकी फक्त 8 रेकॉर्ड होऊ शकल्या. यात दोन गझल, दोन पंजाबी गाणी, दोन ठुमरी आणि दोन गुरबानी यांचा समावेश आहे. पण मास्टर मदन आजही स्मरणात आहेत ते ‘युं न रह-रह के हमें तरसाइए’ आणि ‘हैरत से तक रहा जहाँ-ए-वफा मुझे’ या गझलमुळे. या दोन्ही गझल सागर निजामी यांनी लिहिलेल्या आहेत. या दोन्ही गझल तुम्ही यूट्यूबवर सहज ऐकू शकता.