पुण्यात रात्री 1 वाजता या मराठी अभिनेत्रीला ‘हा’ अनुभव, पोस्ट होतेय Viral

पुण्यात रात्री 1 वाजता या मराठी अभिनेत्रीला ‘हा’ अनुभव, पोस्ट होतेय Viral

आज आपण पहातो की महिलांची सुरक्षितता ही किती महत्त्वाची आहे. रात्री-अपरात्री काम करून घरी परतणाऱ्या महिलांसाठी तर किती संकटांना सामोरे जावे लागत असेल. कारण रात्रीच्या वेळी चोरटे तसेच नको असलेले हिरोगिरी करत फिरणारे व्यक्ती.

या सर्वांपासून बचाव करत महिलांना रात्री वेळेत घरी पोहोचायचं असते. या सर्वांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. आज आपण अशाच एका घटनेविषयी जाणून घेणार आहोत. रात्रीच्या वेळी अभिनेत्रीला पोलिसांनी मदत केली आहे.

महाराष्ट्र पोलीस सुरक्षेसाठी कायम तत्पर असतात. याचा अनुभव नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीला आला आहे. मोरूची मावशी या नाटकातील अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी ने केलेली एक पोस्ट सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. पुणे पोलीसांसोबत एक सेल्फी व एक पोस्ट शेयर केली आहे.

या पोस्टमध्ये नित्यश्री म्हणते की, काल रात्री बारा वाजता नाटकाचा प्रयोग संपला. प्रयोगानंतर आम्ही सगळे कलाकार जेवण करून निघालो. आज पुन्हा पुण्यात प्रयोग म्हणून बाकी सगळे हॉटेलला थांबणार होते. मी मात्र माझ्या पुण्यातील घरी जाणार म्हणून जेवण आटपून घाईघाईत निघाले.

तरीही निघेपर्यंत एक वाजला. बालगंधर्व वरून कर्वेनगर फार दूर नाही. म्हणून तर तशी भीती नव्हती. ओला कॅब बुक करून जाते, असे म्हणत ओला बुक केली, पण ती कॅन्सल. रिक्षा देखील नाही. रस्ता शांत. सिनेमात घडावा तसा प्रकार घडला. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून हिरोंची एन्ट्री झाली.

खरे हिरो तेच! रात्री रस्त्यावर एकटी मुलगी बघून ती पोलिसांची गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. गाडीत डेक्कन पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर संजय मोगले आणि त्यांचे दोन पोलिस कर्मचारी होते. त्यातील एक जण खाली उतरून माझी चौकशी करू लागला आणि लगेच माझ्यासाठी रिक्षा पाहून लागले.

शेवटी वाट पाहून त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसण्याची विनंती केली. मी गाडीत बसले. काही अंतरावर चौकात रिक्षा दिसल्या. रिक्षा ड्रायव्हर ला जवळ बोलावून मला सुव्यवस्थित स्थळी पोहोचवण्यात सांगितले. सोबत त्यांनी रिक्षाचा नंबर ड्रायव्हरचे डिटेल्स देखील घेतले.तिथून निघताना त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

गाडीतून उतरत एक सेल्फी घेऊन मी सुखरूप घरी पोहोचले. खरं घरातील सुख दुखांचे प्रसंग अगदी कुटुंबपणाला लावून जे अहोरात्र केवळ आपल्या सेवेसाठी तत्पर असतात त्या हिरोंना माझा मानाचा मुजरा!!! तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. मनःपूर्वक धन्यवाद .”जय हिंद”

अशाप्रकारे नित्याश्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी पोलिसांनी बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Team Hou De Viral