सनी देओलचे बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीं सोबत होता रिलेशनशिपमध्ये, एक तर सुपरस्टारची पत्नीदेखील होती

सनी देओलचे बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीं सोबत होता रिलेशनशिपमध्ये, एक तर सुपरस्टारची पत्नीदेखील होती

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो सनी देओल चित्रपटांमधील डायलॉग साठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचा प्रवास खूप वेगळा आहे. त्याचे वडील धर्मेंद्र यांच्यापेक्षा त्याचे रूप पूर्णपणे भिन्न आहे. तुम्ही सनीमध्ये त्याचा लाजळू स्वभाव बर्‍याचदा पाहिला असेल. पण त्यांच्या वागण्यात नेहमीच कठोरपणा असतो.

अगदी चित्रपटांमध्येही सनीला रागावलेली व्यक्ती म्हणून दाखवले जाते. तर आपण आज सनी देओलच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी पाहूया ज्या तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. चित्रपटांमध्ये सनी रोमान्स करण्यास नकार देतो, पण खऱ्या आयुष्यात बर्‍याचदा आपल्या अफेअर्सच्या निमित्ताने मीडियाच्या चर्चेत असतो.

सनी देओलने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात आपल्या ‘बेताब’ या चित्रपटाने केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून अमृता सिंगही होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमृता आणि सनी एकमेकांचे खूप जवळचे झाले. तसे, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो चित्रपट जगतात नशीब आजमावण्यापूर्वी त्याने पूजा नावाच्या मुलीशी लग्न केले होते. पण सनीने अमृताच्या जवळ असल्यामुळे त्याने पूजाशी असलेले आपले विवाहबंधन अमृतापासून लपवून ठेवले होते.

दोघांची जोडी पडद्यावर चांगलीच प्रसिद्ध होती, अगदी अमृतासुद्धा सनी देओलच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती आणि तिचेही त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती. पण सनीला नेहमी हे संबंध लपवून ठेवायचे होते आणि तो अमृताशी लग्न करण्यास तयार नव्हता.आणि त्याचबरोबर ही गोष्ट अमृताच्या आईलादेखील कळाली आणि तिची आई आपल्या मुलीच्या नात्याच्या विरोधात होती.

याच दरम्यान, अमृताच्या आईने सनीची चौकशी करायला चालू केली व त्या चौकशीत सनी आधीच विवाहित असल्याचे तिला कळाले. हे सर्व समजल्यानंतर अमृता पूर्णपणे तुटली होती. सनीचे हे रहस्य जाणून घेतल्यानंतर अमृताने सनीबरोबरचे तिचे सर्व संबंध तोडले आणि स्वतःला त्याच्यापासून पूर्णपणे वेगळे केले.

अमृता गेल्यानंतर डिंपल कपाडिया सनीच्या आयुष्यात आली. डिंपलला सनीने स्वतःच्या आयुष्यात पत्नीचा दर्जा दिला. सनी डिंपलच्या खूप प्रेमात होता पण त्याने मीडियावरून ही गोष्ट लपवून ठेवली. दोघेही जवळपास ११ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अगदी डिंपलची मुलगी ट्विंकल खन्ना देखील सनीला पापा म्हणत.

११ वर्षांपासून डिंपलने सनी आणि पूजाच्या घटस्फोट होण्याची वाट पाहिली होती. डिंपलच्या प्रेमात पडल्यानंतरही सनीने पूजाला घटस्फोट दिला नाही, म्हणूनच ती सनीपासून वेगळी झाली. यानंतर, सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या नात्यावर चर्चा सुरू झाली. या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली होती. आपल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.

लग्न झालेले असूनही सनी बहुतेक वेळेस इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींशी असलेल्या नात्यामुळे नेहमी चर्चेत असतो. पण प्रत्येक वेळी सनी आपले अफेअर लपवत असतो. असे असूनही, लोकांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती मिळते. अभिनेत्री अमृता सिंग, डिंपल कपाडिया, मीनाक्षी शेषाद्री यांच्याशिवाय सनीचे नाव इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि खूप सुंदर अभिनेत्री रवीना टंडनशी संबंधित आहे.

रविनासोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लवकरच हे दोघेही एकमेकांपासून वेगळे देखील झाले. यानंतर, रवीनाने तिच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करणे योग्य समजले आणि सनीपासून वेगळं होण्याचं आणखी एक वेगळं कारण म्हणजे तो आधीच विवाहित होता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral