झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका’माझ्या नवऱ्याची बायको’ मधील या कलाकाराचे झाले नि ध न

झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका’माझ्या नवऱ्याची बायको’ मधील या कलाकाराचे झाले नि ध न

आपल्या सर्वांना माहितीच असेल की लॉकडाउननंतर अनलॉक झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत सर्व मालिकांचे चित्रीकरणाला सुरूवात ही झालेली आहे. झी मराठीवर प्रदर्शित होणारी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हिच्या शूटिंगला देखील अलीकडे सुरूवात झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या मालिकाचे पुढील भाग पाहता येत आहेत.आपण बघितलेच असेल की मालिकांमध्ये सोशल डिस्टसिंग व सेट सॅनिटायझेशनलाही ह्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. असे असले तरी बऱ्याचशा कलाकारांना मालिकेतून वगळण्यात आलेले पाहायला मिळते आहे.आणि त्यात आता माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील एका कलाकाराचे नुकतेच निधन झाल्याचे आता समोर आले आहे.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेता विजय वीर यांचे निधन झाल्याचे आता समजत आहे. आपण विजय वीर यांना एक सहकलाकार म्हणून बघत होतो. त्यांचे २० जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हृदय विका राच्या तीव्र झटक्याने रुग्णालयातच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने मालिकेतील इतर कलाकारांनीही एक चांगला सहकलाकार आणि एक चांगला मित्र गमावला असल्याची खंत व्यक्त केली आहे.

आपण त्यांना माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुलमोहर सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डची छोटीशी भूमिका साकारताना पाहिले असेलच. या भूमिकेमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून ते मालिकेशी आणि त्यातील कलाकारांशी जोडले गेले होते. इतर सह कलाकारांसोबत एक भावनिक नाते जोडले गेल्याने त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेच्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या मालिकेव्यतिरिक्त विजय वीर यांनी नऱ्या (२०१७), माधव अशा काही मराठी हिंदी चित्रपटातून काम केले आहे.

Team Hou De Viral