‘सोन्याची पावलं’ मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचे झाले निधन

‘सोन्याची पावलं’ मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचे झाले निधन

कलर्स मराठी वर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. त्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सोन्याची पावलं ही मालिका देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेमध्ये भाग्यश्री आणि दुष्यंत यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. एका छोट्या गावातून आलेली भाग्यश्री ही मुलगी आहे. भाग्यश्री हीची जगण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे. भाग्यश्रीच्या आईचे लहानपणीच निधन झाले आहे.

त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. सावत्र आई तिला प्रचंड त्रास देत असते. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते असे आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. त्यावेळेस तिच्यासमोर लग्न हाच एक पर्याय असतो. लग्न झाल्यानंतर आपल्याला तसा जोडीदार मिळावा यासाठी तुझी धडपड सुरू असते.

तर दुसरीकडे दुष्यंत इनामदार हा इनामदार घरातला एक चाणाक्ष मुलगा आहे. या मालिकेत दुष्यंत याची भूमिका अभिनेता आदित्य दुर्वे याने साकारली आहे. एका प्रसंगामध्ये दोघांची एक वेळ ओळख झाल्यानंतर भाग्यश्री ही इनामदार घरची सून होते. आता या दोघांचेही या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर देखील आदित्य हा खूप सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांना नेहमीच नवीन अपडेट देत असतो. सोन्याची पावलं या मालिकेत आता नवीन ट्विस्ट याला मिळत आहे. त्यामुळे ही मालिका येणाऱ्या काही काळामध्ये अतिशय रंजक वळणावर जाणार असल्याची दिसत आहेत. आता आदित्य याच्या बाबतीत एक दुःखाची बातमी घडलेली आहे.

कलर्स मराठी वरील सोन्याचे पावलं या मालिकेत दुष्यंत की मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य दुर्वे वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचं नुकतेच दुखद निधन झाले आहे. त्याने सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, मम्मी खुप काही बोलावं वाटतं.

पण आता काही बोलता येईना. फक्त एवढेच म्हणेन तू खूप लवकर निघून गेलीस. हे तुला कधीच सांगू शकत नाही. पण तुझा अभिनेता बेटा तुझ्यावर खूप प्रेम करतो. मम्मी मला माहित आहे की, तू नेहमीच माझ्या सोबत आहेस अशी भाऊक पोस्ट आदित्यने शेयर केली आहे..

Team Hou De Viral