काजूचे सेवन करत असाल तर सावधान, ‘या’ लोकांसाठी काजूचे सेवन ठरू शकते घातक !

काजूचे सेवन करत असाल तर सावधान, ‘या’ लोकांसाठी काजूचे सेवन ठरू शकते घातक !

इथे क्वचितच असा कोणी असेल ज्याला ड्राय फ्रूट्स खायला आवडत नसतील आणि ड्राय फ्रूट्समध्येही काजू सर्वाधिक पसंत केला जातो. काजूची चव फक्त चांगलीच नव्हे तर त्यामध्ये बरेच पोषक तत्वे देखील असतात. निरोगी राहण्यासाठी बहुतेकदा डॉक्टर काजू खाण्याचा सल्ला देतात.

काजूमध्ये फायबर, प्रथिने, लोह आणि इतर बरेच अँटी-ऑक्सिडेंट घटक असतात. काजू कर्करोगासाठी फायदेशीर आहे. यामुळे कमी रक्तदाब होण्याची समस्या दूर होते आणि काजू खाल्ल्याने मधुमेह देखील नियंत्रणात राहतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काजू खाल्ल्याने आपला डोकं फास्ट चालते म्हणजेच तेज होते.

काजूत उपस्थित असणारे मॅग्नेशियम घटक मेंदूत रक्त संचार उत्तमरीत्या वाढवते. हे सर्व विशेष गुण असूनही, काही शारीरिक समस्या देखील आहेत ज्यामध्ये काजूचे सेवन करू नये. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांसाठी काजूचे सेवन हानिकारक असू शकते.

जाड लोकांनी काजू अजिबात खाऊ नये

जास्त जाड लोक म्हणा किंवा ज्यांच्या शरीरात चरबी जास्त आहे त्यांनी काजू अजिबात खाऊ नये कारण काजूमध्ये चरबी जास्त असते. संशोधनानुसार 30 काजूंमध्ये 163 कॅलरी आणि 13.1 ग्रॅम चरबी असते. ज्यांचे वजन आधीच वाढलेले आहे त्यांनी काजू खाणे टाळावे.

पोटाच्या समस्ये बाबत हानिकारक –

पोटाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनीही काजू खाणे टाळावे. काजूमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते सहजासहजी पचत नाही. काजूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. काजूचे जास्त सेवन केल्याने पोट फुगण्याची समस्या देखील उद्भवू शकते. ज्यांना बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त किंवा पचन संबंधित तक्रारी आहेत त्यांनी काजू पूर्णपणे टाळले पाहिजेत.

मायग्रेनच्या रुग्णांनी काजू खाऊ नयेत –

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मायग्रेनच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनीही काजूचे सेवन करू नये. काजूमध्ये भरपूर अ‍ॅसिड असते ज्यामुळे डोकेदुखीत वाढ होते.

आपल्याला जर गॉल ब्लॅडर मध्ये दगड असल्यास सावधगिरी बाळगा –

ज्यांना गॉल ब्लेडर खड्यांचा त्रास आहे, त्यांनी काजू खाणे टाळावे. काजूमध्ये असणारे ऑक्सॅलेट्स अशा रुग्णांना हानी पोहोचवू शकतात. सामान्यत: असे मानले जाते की उच्च कोलेस्ट्रॉल ग्रस्त लोकांना गॉल ब्लेडरच्या खड्यांचा त्रास जास्त असतो आणि काजूमध्ये जास्त चरबी देखील असते. अशा परिस्थितीत काजू गॉलब्लेडर ची वेदना वाढवू शकतो.

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी टाळले पाहिजे –

उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला काजू खायला देऊ नये. काजूमध्ये सोडियमची महत्त्वपूर्ण म्हणजे जास्त मात्रा असते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हाय बीपी रुग्णांनी काजूचे सेवन नियंत्रित केले पाहिजे.

काजू खाण्याचा हा योग्य मार्ग आहे –

जर आपण काजू तेलात तळुन खाल्ले तर ही पद्धत चुकीची आहे. काजूमध्ये असलेले गुणधर्म यामुळे नष्ट होतात. काजूला चविष्ट बनवण्यासाठी तळण्याऐवजी किंचीत भाजून घ्या आणि थोडे मीठ घालावे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral