‘या’ वनस्पतीमध्ये आहे चांगल्या आरोग्याचा खजिना, खूप आजारांवर आहेत फायदेशीर

‘या’ वनस्पतीमध्ये आहे चांगल्या आरोग्याचा खजिना, खूप आजारांवर आहेत फायदेशीर

घराच्या दारात लावली जाणाऱ्या वनस्पतीमध्ये काही असे गुण आढळतात जे ओळल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या सर्व वनस्पतींमध्ये, तुळशीची वनस्पती लोकांच्या घरात जास्त करून आढळते.

तुळस –

तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असतात. सर्दी झाल्यावर बर्‍याच लोकांना तुळशीच्या वापराविषयी माहिती असते. तुळशीची दोन किंवा तीन पाने दररोज खाल्ल्याने रक्त विकार, संधिरोग आणि मधुमेहामध्ये फायदा होतो. तुळस शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया की तुळशीप्रमाणे इतर कोणत्या वनस्पती आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

कडुनिंब –

कडुनिंबाच्या पानांचा वापर हा त्वचारोगाच्या समस्येवर उपाय म्हणून केला जातील. कडुलिंबामध्ये एंटीबायोटिक गुणधर्म असतात. कडूलिंबाद्वारे दंत समस्या देखील दूर होतात. कडूलिंबाच्या काडीने नियमित दात घासल्याने हिरड्या बाबत समस्या जाणवत नाही. कडुनिंबाची पाने पाण्यात टाकल्यानंतर आणि उकळल्यानंतर त्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे आजार, फोड आणि मुरुम वगैरे दूर होतात.

पुदीना –

पुदीना एक चांगला माऊथ फ्रेशनर आहे, तो आपल्या घरात सहज उगवला जाऊ शकतो. त्याची पाने तोंडात चघळत किंवा पाण्यात उकळवून त्याने तोंड स्वच्छ धुल्याने तोंडाचा दुर्गंध कमी होतो. पुदीनाचा रस पोटाशी संबंधित त्रास जसे की अपचन इत्यादीपासून आपली सुटका करतो.

बेल –

बेलाचे झाड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याचे फळ खूप चवदार असते आणि त्याच बरोबर आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. बेलाचे सरबत पोटाची उष्णता शांत करते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात, बेलाचे सरबत तयार करा आणि प्या. उन्हाळ्यात गरम हवा (उन्हाळी लागणे) लागते तेव्हा बेलाचे सरबत खूप फायदेशीर असते. तसेच पोटाच्या इतर समस्यांमध्येही बेलाचे सरबत फायदेशीर ठरते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral