महिलांनी घरात चुकूनही करू नयेत ही ‘5’ कामे, नाहीतर घरात येते दारिद्र्य

महिलांनी घरात चुकूनही करू नयेत ही ‘5’ कामे, नाहीतर घरात येते दारिद्र्य

हिंदु धर्मशास्त्राने महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे. आपल्या घरची स्त्री ही आपल्या घरची लक्ष्मी असते. त्यामुळे घरात लक्ष्मी वावरणे किंवा टिकणे हे मुख्यतः घरातील महिलांच्याच हाती असतं. जेव्हा घरच्या लक्ष्मीकडूनच कळत नकळत चुकीची कार्य घडतात, तेव्हा घरात दारिद्रय येणं सहाजिकच आहे. ह्या ५ चुका महिलांनी नकळतही करू नका अन्यथा घरात गरिबी येऊ शकते. देवी लक्ष्मी अशा चुकीच्या कार्यांमुळे रुष्ठ होऊन घरातून निघून जाऊ शकतात आणि वाट्याला दारिद्र्य येते.

१) घरात पैसा येत नसेल किंवा टिकत नसेल तर त्याचं कारण उशीरा उठणे असू शकतं. महिलांनी सूर्योदयापूर्वी उठावं. आपल्या घराची, अंगणाची साफसफाई करावी. बऱ्याच महिलांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर प्रथम किचनमध्ये प्रवेश करतात आणि चहा किंवा नाष्टा बनवतात.

स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असतात आणि अशा ठिकाणी अंघोळ न करता जाणे हे हिंदू धर्मात निषिद्ध मानले आहे. त्यामुळे चुलीवर किंवा गॅसवर कोणतेही अन्नपदार्थ शिजवण्यापूर्वी महिलांनी स्नान करणे गरजेचे आहे. स्नान केल्यावर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि नंतरच स्वयंपाक घरात प्रवेश करावा.

२) ज्या महिलांचा स्वभाव किरकिरा आहे, सतत कटकट करणारी असेल, अशी स्त्री जी सातत्याने भांडत असेल, अशा घरात देखील लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे स्वतःच्या स्वभावात बदल करणे गरजेचे आहे. रोज गायत्री मंत्राचे पठण करावे, ध्यान करावे, त्याने मनाला शांती लाभण्यास मदत होते व चिडचिड कमी होते आणि चेहऱ्यावर आनंद , उत्साह आणि चैतन्य दिसून येते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि बरकत होते.

३) ज्या महिला सूर्योदयानंतर उठतात आणि घराची साफसफाई करतात त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. सुर्यास्तानंतर घरात झाडू कधीच मारू नये. सूर्य मावळल्यानंतर महिलांनी केस विंचरू नये. अशा चुकांमुळे घरात वास्तुदोष उत्त्पन्न होतात आणि घराची बरकत थांबते आणि घराची प्रगती होत नाही. आपल्या घरात गळते नळ असतील तर ते त्वरित दुरुस्त करा कारण ज्याप्रकारे ह्या नळातून पाणी ठिबकत असत त्याच प्रमाणे घरातला पैसा सुद्धा बाहेर जातो असं हिंदुधर्मशास्त्र मानतं.

४) महिलांनी घरातील झाडू हा लपवून ठेवावा. घराबाहेरील लोकांच्या दृष्टीत झाडू कधीच पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी कारण झाडूसुद्धा लक्ष्मीस्वरूप आहे. आपल्या झाडूवर जेव्हा दुसऱ्याची नजर पडते तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरात जाण्यास वेळ लागत नाही. तसेच झाडू हा नेहमी आडवा करून ठेवावा, उभा करून ठेवू नये कारण लक्ष्मी ही चंचल मानलेली आहे.

ती एक ठिकाणी कधीच राहत नाही आणि झाडू उभा करून ठेवणे म्हणजे आपण स्वतः माता लक्ष्मीला आपण चंचल स्वरूपात आणतो. त्यामुळे झाडू नेहमी लपवून ठेवावा, आडवा ठेवावा. झाडू कधीच किचनमध्ये ठेवू नये , जर तुमच्या घराची भरभराट होत नाहीये तर हा नियम नक्की पाळा.

५) बऱ्याच महिलांना सवय असते की त्या खरकटी भांडी साचवून ठेवतात. त्या साचलेल्या भांड्यामुळे सुद्धा वास्तुदोष उत्त्पन्न होतात. जर तुम्हाला भांडी घासायला वेळ नसेल तर कमीतकमी ती पाण्याने धुवून ठेवावी , खरकटं त्यात राहून देऊ नका जेणेकरून घरात वास्तुदोष उत्पन्न होत नाही. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघराची व्यवस्थित साफसफाई करावी आणि एक बादलीभर पाणी भरून ठेवावी त्यामुळे देखील घराची बरकत होण्यास मदत होते.

सूर्य मावळल्यानंतर दूध , दही , कांदा अशा वस्तू कोणाला उधार देऊ नका. ह्या गोष्टींचा आणि आपल्या आर्थिक प्रगतीचा खूप जवळचा संबंध असतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral