‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा ट्विस्ट, मिथिलाच्या बातमीमुळे यश-नेहाचा मोठा अपघात

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा ट्विस्ट, मिथिलाच्या बातमीमुळे यश-नेहाचा मोठा अपघात

झी मराठीवर सुरू असलेली माझी तुझी रेशीमगाठी मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या. मात्र, आता मालिकेची नव्या वेळेमध्ये बोळवण करण्यात आली आहे, असे म्हणावे लागेल. कारण की या मालिकेला गेल्या काही दिवसापासून ट्रॅक मिळत नव्हता.

त्यामुळे या मालिकेची वेळ बदलण्यात आली असे देखील बोलण्यात येत होते. तर दुसरीकडे आता कोरोना महामारी जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे आता मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना इतर भूमिका मिळत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये आघाडीचे कलाकार सहभागी आहेत.

यामध्ये श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, संकर्षण कराडे यासारखे कलाकार काम करतात. त्यामुळेच त्यांनी ही मालिका सोडली की काय अशी चर्चा मध्यंतरी होती. मात्र, असे काही नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. मालिकेमध्ये एक नवीनच ट्रॅक पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे याने अनेक वर्षानंतर छोट्या पडल्यावर पुन्हा काम केले.

साधारणतः वीस वर्षांपूर्वी श्रेयस तळपदे हा आपल्याला आभाळमाया या मालिकेत दिसला होता. आभाळमाया मालिका त्यावेळेस प्रचंड चालली होती. सुकन्या कुलकर्णी मोने यांची प्रमुख भूमिका त्यावेळेस या मालिकेत होती, तर आता श्रेयस तळपदे आपल्याला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये यश या भूमिकेमध्ये दिसत आहे, तर या मालिकेमध्ये नेहाच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रार्थना बेहेरे ही दिसत आहे.

संकर्षण कराडे याने या मालिकेमध्ये समीर ही भूमिका साकारली आहे. मध्यंतरी आजोबाच्या भूमिकेमध्ये दिसलेले मोहन जोशी यांनी देखील ही मालिका सोडली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता या मालिकेमध्ये प्रदीप वेलणकर हे दिसत आहेत. तर आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये एक नवीनच वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे.

कारण की याबाबतचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानुसार यश याचा अतिशय गंभीर अपघात झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता यश याला काय होते याची चिंता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. तर दुसरीकडे मिताली हिला देखील आता बाळ होणार आहे. त्यामुळे चौधरी कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

मात्र, असे आनंदाचे वातावरण असतानाच मालिकेमध्ये वेगळे वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे. यश आणि नेहा हे बाहेर जात असतात. बाहेर गेल्यानंतर त्यांना तातडीने सिमी हिचा फोन येतो. सिमी ही नेहाला फोन करून सांगते की, मिताली ही खाली पडली आणि तिचे बाळ गेले. त्यावर नेहा म्हणते की, बाळ कसे काय जाऊ शकते.

हे सर्व यश गाडी चालवतानाच ऐकत असतो. मात्र, हे सगळं काही ऐकल्यानंतर यश याला देखील प्रचंड धक्का बसतो आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि गाडी एका ठिकाणी जाऊन जोरात आदळते. यामध्ये यश हा गंभीर जखमी होतो. तर नेहा ही गाडीच्या बाहेर फेकल्या जाते. त्यामुळे आता यशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येते.

एकूणच काय तर आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये एक नवीन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Team Hou De Viral