‘बिगबॉस मराठी’ मधली ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात चालवते ‘रिक्षा’

‘बिगबॉस मराठी’ मधली ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात चालवते ‘रिक्षा’

कलर्स मराठी वर बिग बॉस हा शो सुरु होऊन जवळपास दोन आठवड्याचा कालावधी लोटला आहे. आता या शोमध्ये खऱ्या अर्थाने रंगत चढत चालली आहे, असे म्हणावे लागेल. कारण की या शोमध्ये आता भांडण हाणामाऱ्या आणि इतर गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपण पाहत आहोत.

बिग बॉस हा शो आता लोकप्रिय होताना दिसत आहे. बिग बॉसच्या शोमध्ये आपल्याला अनेक स्पर्धक सहभागी झाल्याचे दिसत आहेत. यामध्ये सर्वच जण सेलिब्रिटी आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये निखिल राज शिर्के हा आता घराच्या बाहेर पडला आहे. तो घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याने आपली एक प्रतिक्रिया देखील नोंदवली आहे.

बिग बॉसच्या घरामधला माझा अनुभव हा खूप चांगला होता, असे त्याने म्हटले आहे. तर बिग बॉस शो मध्ये आपल्याला किरण माने, विकास सावंत, अपूर्वा नेमळेकर, यशश्री मसुरेकर, रोहित शिंदे, रुचिरा जाधव, समृद्धी जाधव यांच्यासह अमृता देशमुख आणि इतर स्पर्धक देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या बिग बॉसच्या शोमध्ये अपूर्वा नेमळेकर हिचा आणि प्रसाद जवादे याचा प्रचंड वाद झाल्याचे आपण पाहिले. त्यांचा हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यानंतर हे प्रकरण हातपायीवर देखील गेले होते. मात्र, त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी केली आणि हे प्रकरण नंतर थांबले. आठवड्याच्या चावडीवर बिग बॉस अर्थात महेश मांजरेकर यांनी देखील या कलाकारांना चांगले सुनावले होते.

आपण अशा पद्धतीने खेळ करता यामुळे याचा परिणाम वाईट होतो, असे देखील त्यांनी म्हटले होते. बिग बॉसच्या घरामध्ये किरण माने हे देखील सहभागी झाले आहेत. किरण माने यांनी या आधी अनेक मालिका, चित्रपटात काम केले आहे. मात्र, किरण माने यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती मुलगी झाली हो या मालिकेमधूनच. मुलगी झाली हो या मालिकेमध्ये त्यांनी चांगले काम केले.

मात्र, मध्यंतरी त्यांचा प्रचंड वाद झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की नंतर त्यांना ही मालिका सोडावी लागली. त्यांनी एक राजकीय भाष्य केले होते. त्यामुळे त्यांना मालिका सोडावी लागली, असे त्यावेळेस सांगण्यात आले होते. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेला रोहित शिंदे हा व्यवसायाने डॉक्टर आहे.

तो खूप प्रॅक्टिस देखील करत असतो. असेच या शोमध्ये सहभागी झालेले अनेक स्पर्धक हे काही ना काही वेगळा व्यवसाय करतात. आता बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेली यशश्री मसुरेकर ही देखील एक सेलिब्रिटी आहे. ती रेडिओ जॉकी सोबत अभिनेत्री देखील आहे. मात्र, अनेक जणांना ही गोष्ट माहित नाही, की ती आपले शूट करण्यासाठी अनेकदा रिक्षातूनच जात असते.

तिच्याकडे एक विशेष करून तयार करण्यात आलेला एक रिक्षा आहे. याबाबतचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यशश्री ही एका मुलाखतीसाठी जाताना ऑटो घेऊनच गेलेली आहे आणि जाताना एका चहाच्या टपरीवर देखील थांबलेली आहे.
तिचा एक मित्र बँकोकहून सायकलवर आला होता.

त्यानंतर तिला ऑटोमधून प्रवास करण्याची प्रेरणा मिळाली, असे तिने सांगितले आहे. तर आपल्याला यशश्री मसुरेकर आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral