गर्लफ्रेंड सोबत फोटो शेअर करत ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधल्या ओम ने दिली ‘गुडन्यूज’

गर्लफ्रेंड सोबत फोटो शेअर करत ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधल्या ओम ने दिली ‘गुडन्यूज’

छोट्या पडद्यावर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेमध्ये ओम आणि स्वीटू यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये सगळ्याच भूमिका या लोकप्रिय ठरल्या आहेत.

ओमची भूमिका अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी साकारली आहे. तर स्वीटूची भूमिका ही अन्विता फलटणकर हिने साकारली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला किशोरी आंबिये या देखील दिसलेल्या आहेत. त्यांनी देखील अतिशय चांगले काम या मालिकेत केले आहे. या मालिकेमध्ये आदिती सारंगधर हिनेदेखील मालविकाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली आहे.

आता ही मालिका लवकर संपणार आहे, असे संकेत मिळत आहेत. या मालिकेच्या जागी दुसरी एक मालिका लवकरच सुरू होईल. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमध्ये अतिशय घरगुती कथा दाखवण्यात आली आहे. असे असले तरी ही मालिका लोकप्रिय ठरली होती. शाल्व किंजवडेकर याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.

शाल्व हा दिसायला अतिशय हँडसम असा तरुण आहे. तो सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. मालिकेत ज्याप्रमाणे त्याचे लग्न झाले आहे, त्याप्रमाणेच आता खऱ्या आयुष्यात देखील तो लग्न करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

शाल्व हा सोशल मीडियावर आपल्या गर्लफ्रेंडचे फोटो नेहमी शेअर करत असतो. आता हे दोघे लग्न करणार का? असा प्रश्न देखील अनेकांनी विचारला आहे. शाल्व हा गेल्या तीन वर्षांपासून श्रेया डाफळापूरकर हिला डेट करत आहे. श्रेयाचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. शाल्व हा अतिशय हॅंडसम असा अभिनेता आहे.

तो सोशल मीडियावर सक्रिय असल्याने अनेक तरुणी या त्याच्या फॅन आहेत. तो तरुणीसोबत देखील चर्चा करताना दिसत असतो. शाल्व आणि श्रेया यांच्या नात्याला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवरच शाल्वने एक गुड न्यूज दिली आहे. आमच्या नात्याला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत.

त्यामुळे त्याने त्याचे आणि श्रेयाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. आमच्या नात्याला आता नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. सिंड्रेला तू मला भेटली हे माझे भाग्य समजतो. नेहमी खेळांमध्ये तूच जिंकतेस तू चांगला खेळ करतेस. पण ते पण ठीक आहे, असे त्याने म्हटले आहे. आता हे दोघेही कधी लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Sayali