‘तो म्हणाला ताई मी पैसे देतो, हातवारे करून त्याने घाण…’ मेघा घाडगेचा ह्या स्पर्धकावर गंभीर आरोप

‘तो म्हणाला ताई मी पैसे देतो, हातवारे करून त्याने घाण…’ मेघा घाडगेचा ह्या स्पर्धकावर गंभीर आरोप

बिग बॉस या शोमध्ये सध्या भांडण, राडे, मारामाऱ्या होताना खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सध्या कोणाचाही कुणावर विश्वास नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या शोमध्ये अनेक स्पर्धक हे वेगवेगळ्या टास्क दरम्यान आपल्या सहकारी स्पर्धकावर संशय घेताना दिसत आहेत.

कलर्स मराठी वर 2 ऑक्टोबर पासून बिग बॉसचे चौथे सत्र सुरू झाले आहे. या चौथ्या सत्रामध्ये अनेक स्पर्धक हे सहभागी झाले आहेत. त्यामध्ये प्रसाद जवादे, अमृता देशमुख, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, विकास सावंत, यशस्वी मसुरेकर, योगेश जाधव, डॉक्टर रोहित शिंदे, रुचिरा जाधव, समृद्धी जाधव या कलाकारांसह अनेक कलाकार हे सहभागी झाले आहेत.

आता या शोदरम्यान पहिले नॉमिनेशन देखील झाले आहे. त्यानुसार निखिल राज शिर्के हा या शोच्या बाहेर पडला आहे, तर आता बिग बॉसच्या घरातून मेघा घाडगे बाहेर पडली आहे. मेघा घाडगे ही बाहेर पडताना अनेकांना दुःख अनावर झाले होते. अनेक जण तिच्यासाठी रडले देखील होते. मेघा घाडगे ही अतिशय जबरदस्त अशी अभिनेत्री आहे.

मात्र, आता मेघा घाडगे ही या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. आता बिग बॉस घरातून बाहेर पडल्यानंतर मेघा घाडगे हिने अनेक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मेघा घाडगे ही म्हणाली की अमृता देशमुख हिने माझी चूक नसताना देखील मला नॉमिनेट केलं आणि किरण माने यांच्यामुळे मी या घराच्या बाहेर आले.

मी सगळ्यांना सांगते की, आता घरामध्ये तुम्ही सगळेजण सांभाळून राहा. मेघा घाडगे यांनी किरण माने यांच्यासोबत योगेश जाधव याच्याबद्दल देखील अनेक खुलासे केले आहेत. योगेश जाधव हा दिसतो तसा नाही. त्याचा खरा चेहरा हा वेगळाच आहे. पहिल्या दिवसापासून योगेश याचा त्याच्या तोंडावर अजिबात ताबा नाही. योगेश प्रत्येक वेळी पैशांच्या गोष्टी करतो.

प्रत्येक गोष्ट पैशांमध्येच तो मोजत असतो. दरवेळी तो मला बोलायचा की, ताई पैसे पाहिजेत का? आम्हाला नाचून दाखवता का? तसेच हातवारे करून योगेश ने घाण शिवी दिली असे शब्द त्याच्या तोंडातून यायचे इतकच नाही तर मला त्याने ताई मला एक लाख रुपये द्या. मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतो, असे देखील तो म्हणाला होता, असा आरोप मेघा घाडगे हिने केला आहे.

तर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. आधी निखिल याने आरोप केले होते. आता मेघा ही आरोप करत आहे.

Team Hou De Viral