‘झी मराठी’ वरील ही प्रसिद्ध मालिका लवकरच घेणार प्रेक्षाकांचा निरोप, ही नवीन मालिका होणार सुरू

‘झी मराठी’ वरील ही प्रसिद्ध मालिका लवकरच घेणार प्रेक्षाकांचा निरोप, ही नवीन मालिका होणार सुरू

झी मराठी या वाहिनीवर गेल्या दीड ते दोन वर्षात अनेक नवीन मालिका या सुरू झाल्या. मात्र, काही मालिकांनाच यामध्ये यश मिळाले असे आपण पाहिले आहे. गेल्या एक ते दोन वर्षांमध्ये मन झालं बाजींद ही मालिका सुरू झाली होती.

मात्र, अल्पावधीतच या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. मुक्त प्रेमाची उधळण करणारी जोडी असा गौरव या मालिकेचा करण्यात आला होता. मात्र, अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्यात यशस्वी झाली. कारण की या मालिकेला अजिबात टीआरपी मिळाला नाही. त्यानंतर मध्यंतरी देखील अशाच मालिका या सुरू झाल्या होत्या.

आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकादेखील सुरू झाली आहे. या मालिकेला पाच-सहा महिने झाले आहेत. मात्र, ही मालिका देखील प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर तू तेव्हा तशी ही मालिकाही प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तर अशा मध्येच आता एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता ही मालिका कितपत चालते हे तर आपल्याला येणारा काळच ठरवेल. मात्र, या मालिकेमध्ये एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन मालिका येणार आहे. या मालिकेमध्ये आपल्याला एक फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. ही मालिका संगीत विश्वावर आधारित असल्याचे माहिती मिळत आहे.

या मालिकेचे नाव हृदयी प्रीत जागते असे या नवीन मालिकेचे नाव आहे. या मालिकेमध्ये नवीन कलाकार दिसणार आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच झी मराठीवर प्रसारित करण्यात आला आहे. 7 नोव्हेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये एक फ्रेश जोडी देखील दिसणार आहे.

या मालिकेमध्ये आपल्याला अभिनेता सिद्धार्थ खिरीट आणि अभिनेत्री पूजा कारतोडे ही जोडी दिसणार आहे. मालिकेच्या प्रोमोवरून आपल्याला ही मालिका संगीताची असल्याचे संकेत मिळत आहेत. रिदामचा बादशाह आणि मी सुरांची राणी कशी असेल यांची प्रेम कहानी, असे या प्रोमो मध्ये सांगण्यात आले आहे.

अशी टॅग लाईन या मालिकेला देण्यात आली आहे. या मालिकेच्या प्रोमो ने पहिल्याच झटक्यात प्रेक्षकांची मनी जिंकली आहे.

Team Hou De Viral