‘माझ्यासाठी प्रार्थना करा…’, प्रसिद्ध गायक ‘बाथरूम’ मध्ये पडून गंभीर जखमी

‘माझ्यासाठी प्रार्थना करा…’, प्रसिद्ध गायक ‘बाथरूम’ मध्ये पडून गंभीर जखमी

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अनेक कलाकार हे गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री श्रीदेवी हिचा देखील दुबई येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता.

बाथरूम मध्ये असलेल्या टब मधील पाण्यात घसरून तिच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत होते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण हे काही वेगळेच होते, असे देखील नंतर सांगण्यात येत होते. मात्र, तिच्या मृत्यूच खरे कारण हे काही अद्याप समोर आलेले नाही. त्यानंतर बॉलीवूडमध्ये अशाच काही दुःखद घटना देखील घडलेल्या आहेत.

बंगालच्या चार अभिनेत्रींनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं, तर आकस्मिक मृत्यू होण्याचे प्रमाण देखील गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इरफान खान, ऋषी कपूर यांना गंभीर आजारांनी ग्रासले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, तर भारताच्या ज्येष्ठ गायिका गानकोकिळा लता मंगेशकर यांचे देखील अलीकडेच निधन झाले.

त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक के. के यांचा देखील नुकताच मृत्यू झाला आहे. के.के हे कोलकाता येथे लाईव्ह परफॉर्म करत असताना त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास झाला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. के.के यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच वेदना पोहोचल्या होत्या.

आता देखील एका प्रसिद्ध गायकाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येते. हा गायक खूप प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमध्ये त्याने अनेक गाणी गायलेले आहेत. या गायकाचे नाव जुबीन गर्गे असे आहे. जुबीन हा नुकताच आसामच्या दौऱ्यावर होता. आसामच्या दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये तो थांबला होता. हॉटेलमध्ये त्याने व्यवस्थित जेवण वगैरे केले.

त्यानंतर बाथरूम मध्ये तो गेला होता. बाथरूम मध्ये त्याचा पाय घसरून त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णाला दाखल करण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाला त्याच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. जुबीन याने अनेक चित्रपटात गाणे गायले आहेत.

मात्र, त्याचे गँगस्टर चित्रपटातील गाणे हे खूप लोकप्रिय ठरले आहे. गँगस्टर चित्रपटातील त्याचे ‘या आली’ हे गाणे चर्चेत राहिले. या गाण्याला लाखो लोकांनी लाईक देखील केले. आता नवीन त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा व्हावी यासाठी अनेकांनी प्रार्थना देखील केली आहे. तसेच त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Team Hou De Viral